नेत्रपेढीप्रमाणे फुफ्फुस पेढीही शक्य - Majha Paper

नेत्रपेढीप्रमाणे फुफ्फुस पेढीही शक्य

lungs
न्यूयॉर्क- शरीरातील नाजूक भाग शरीराबाहेरही चांगल्या स्थितीत जतन करून प्रत्यारोपण वेळी त्यांचा उपयोग करता यावा यासाठी संशोधक गेली अनेक वर्षे संशोधन करत आहेत. शरीरातील असाच नाजूक पण अत्यंत महत्त्वाचा अवयव असलेली फुफ्फुसे कांही काळपर्यंत कार्यरत ठेवता येतील असे तंत्र संशोधकांनी विकसित केले आहे. यामुळे प्रत्यारोपणासाठी ही फुफ्फुसे उपलब्ध होऊ शकणार आहेत.

एक्सव्हीवो परफ्युजन सिस्टीम असे या नव्या तंत्रज्ञानाचे नांव आहे. मिशिगन विद्यापीठातील डॉ. रॉबर्ट बार्ललेट १९६० च्या दशकापासून या तंत्रज्ञानाचा अभ्यास करत होते. या तंत्रज्ञानाच्या शोधात त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली असून त्याच्याच आधारे हे नवे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. वेगवेगळ्या आकाराच्या फुफ्पुसाची बँक त्यामुळे स्थापन करणे शक्य होणार आहे.

फुफफुसे हा शरीरातील महत्वाचा अवयव शरीराबाहेर काढल्यानंतर ३ – ४ तासात खराब होतो. रकत व प्राणवायूच्या अभावामुळे त्यातील कोशिका नाश पावतात. त्यामुळे गरज मोठी असूनही फुफफुसाचे प्रत्यारोपण अत्यंत कमी प्रमाणात यशस्वी होते. कॅनडा , युरोपमध्ये फुफ्फुस प्रत्यारोपणाची गरज असलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. फुफ्फुस बँकेमुळे ही गरज कांही अंशी तरी भागविता येणार आहे असे समजते.

Leave a Comment