जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरले साकारी मोमोई

sakari
टोकियो – गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून जपानच्या साकारी मोमोई यांची नोंद झाली असून मोमोई हे १११ वर्षांचे आहेत. मोमोई यांना गिनीज बुकाचे प्रमाणपत्र बुधवारी झालेल्या कार्यक्रमात देण्यात आले आहे आणि त्यांना या पुरस्काराबाबत विचारले असता त्यांनी आपल्याला आणखी काही वर्षे जगायचे आहे असे सांगितले.

मोमोई यांचा पाच फेब्रुवारी १९०३ मध्ये जन्म झाला. दुस-या महायुद्धानंतर उत्तर टोकियोमधील सैतामा या शहरात स्थिरावले. त्यानंतर तेथील हायस्कूलमध्ये ते प्राध्यापकपदी कार्यरत होते. मोमोई यांना पाच मुले आहेत. पुस्तके वाचणे खासकरुन चीनी भाषेतील कविता वाचणे हा त्यांचा छंद आहे.

Leave a Comment