रवी शास्त्री वाहणार टीम इंडियाच्या संचालकपदाची धुरा

ravi-shastri
नवी दिल्ली : इंग्लंड दौऱ्यातील लाजिरवाण्या पराभवातून महेंद्रसिंह धोनीच्या टीम इंडियाला पुन्हा उभे करण्यासाठी बीसीसीआयने माजी कर्णधार रवी शास्त्री आणि माजी कसोटीवीर संजय बांगर यांचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय संघाच्या संचालकपदी रवी शास्त्री यांची, तर संजय बांगर आणि भारत अरुण यांची भारतीय संघाच्या सहप्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे.

भारतीय संघाचे नवे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर हे असतील. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी डंकन फ्लेचर हे कायम राहतील, पण गोलंदाजी प्रशिक्षक ज्यो डॉस आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक ट्रेव्हर पेनी यांना इंग्लंड दौऱ्यातल्या वन डे सामन्यांच्या जबाबदारीतून विश्रांती देण्यात आली आहे.

Leave a Comment