भारतातील सर्वात मोठा पादचारी पूल सीएसटी स्टेशनवर

flyover

flyover1

flyover3

 

मुंबई – भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठा पूल मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस म्हणजेच, सीएसटी स्टेशनवर बांधण्यात आला आहे.

एकूण १८ प्लॅटफॉर्म सीएसटी स्टेशनवर असून त्यापैकी प्लॅटफॉर्म नंबर १ ते ७ हे उपनगरांसाठी आहेत, तर उरलेले प्लॅटफॉर्म नंबर ८ ते १८ हे सेंट्रल रेल्वेसाठी वापरले जातात. या पादचारी पुलाची लांबी ही ३६४ मीटर लांब आणि ५.३ मीटर रूंद आहे. या पादचारी पुलासाठी ८.५० कोटी रूपये खर्च केले असून यापूर्वी प्रवाशांना पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. मात्र आता प्रवाशांना १ नंबर प्लॅटफॉर्मवरून १८ नंबरच्या प्लॅटफॉर्मवर सहजपणे जाता येणार आहे. सीएसटी पश्चिमकडून जे जे फ्लायओव्हरच्या सहाय्याने सीएसटी पूर्वकडे प्रवाशांना सहजपणे जाता येणार आहे. तर सीएसटी पूर्वच्या पी. डीमेलो रोडवरून पश्चिमेकडे जाता येणार आहे.

या पादचारी पुलाचे लोकार्पण स्थानिक खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

Leave a Comment