डॉलर्सची तस्करी करणार्या गुन्हेगारांसाठी ही महत्त्वाची खबर असू शकते. अमेरिकी संशोधकांनी केवळ वास घेऊन तस्करी करून आणलेले डॉलर्स अचूक ओळखणारे यंत्र विकसित केले असून हे यंत्र प्रशिक्षित कुत्र्याप्रमाणे काम करू शकणार आहे.
स्मगल्ड चलन हुंगून ओळखणारे यंत्र
मिळालेल्या माहितीनुसार मेक्सिकोत अमेरिकेतून फार मोठ्या प्रमाणावर डॉलर्स स्मगल्ड केले जातात. सीमेवरून अवैध मार्गाने ही तस्करी केली जाते. दरवर्षाला किमान ३ कोटी र्डालर्स अशा प्रकारे अमेरिकेतून मेक्सिकोत आणले जातात. संशोधकांनी अमेरिकी डॉलर्सला येणारा विशेष गंध हूंगून ओळखणारे हे यंत्र तयार केले असून ते कुठेही सहज वाहून नेता येणार आहे असे अमेरिकेच्या कायदा अधिकार्यांचे म्हणणे आहे. गतवर्षात सुमारे १०.६ कोटी अमेरिकी डॉलर्स अवैध मार्गाने मेकिसकोत आणले गेले असल्याचेही समजते.