रेहमान प्रेमींसाठी अॅप

rehman
ऑस्कर विजेता संगीतकार ए.आर. रेहमान ने याच्या फॅन्ससाठी खास अॅप आणले असून याच्या मदतीने त्याचे फॅन रेहमानशी तसेच त्याच्या संगीताशी सहज कनेक्ट होऊ शकणार आहेत. फेसबुक आणि ट्वीटरवरील रेहमानचे सुमारे अडीच कोटी फॅन्स त्याला या अॅपमुळे फॉलो करू शकणार आहेत.

हे अॅप युजर खरेदी करू शकेल किवा अॅपमध्ये दिलेली चॅलेंज पूर्ण करून पॉईंट मिळवून अॅपचा वापर करू शकेल. रेहमान, शेखर कपूर आणि समीर बांगरा यांनी स्थापन केलेल्या क्विकी डॉट कॉम या ऑनलाईन मल्टी चॅनल नेटवर्कवर हे अॅप मिळू शकणार आहे. या अॅपमुळे रेहमानच्या सोशल मिडीयावरील ट्वीट थेट अॅक्सेस करता येणार आहेत तसेच अॅपसाठी बनविलेले कांही खास व्हिडीओ, खास फोटोही युजरला मिळू शकणार आहेत. रेहमानने स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा आपल्या देशबांधवांना आणि फॅन्सना देतानाच या अॅपची घोषणा केली आहे.