मुंबईत २५ टक्के पाणीकपात

pipe-line
मुंबई : ठाण्यासह मुंबईतील अनेक उपनगरांना पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन आज दुपारी फुटल्यामुळे पुढील दोन दिवस २५ टक्के पाणी कपात होणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या अधिका-यांनी दिली असून ठाण्यातील वर्तकनगरमध्ये तानसा धरणातून येणारी पाईपलाईन फुटल्याने सर्वत्र पाणी पसरले आहे. या पार्श्वभूमीवर 19 आणि 20 ऑगस्ट रोजी अनेक भागांत 25 टक्के पाणी कपात होणार आहे. पाईपलाईन दुरूस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. हे काम होईपर्यंत कमी दाबाने पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे महापालिकेने मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याची सूचना दिली आहे.

Leave a Comment