धोनीसह टीम इंडियाला आर्थिक दंड

dhoni
नवी दिल्ली – भारतीय संघावर इंग्‍लंडबरोबरच्या कसोटी मालिकेत सपाटून मार खाल्‍ल्‍यामुळे टीकेची झोड उठली असली त्यातच संघासाठी अजून एक वाईट बातमी आली आहे. कर्णधार धोनीवर सामन्याच्या मानधनापैकी 60 टक्के तर उर्वरित संघावर 30 टक्के दंड स्लो ओव्हर रेटमुळे आकारण्यात आला आहे. जर वर्षभरामध्‍ये पुन्‍हा एकदा धोनीने मंदगतीने गोलंदाजी केल्‍यास धोनीवर एका सामन्‍याचा प्रतिबंधसुध्‍दा लावण्‍यात येऊ शकतो.

भारताच्‍या या लाजीरवण्‍या पराभवामुळे भारतीय संघाला मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागते आहे. धोनीच्‍या राजीनाम्‍याचीही मागणी क्रिडाप्रेमींनी केली आहे. तर इंग्‍लंच्‍या माजी क्रिकेटपटू मायकल वॉनने भारतीय संघाची चांगलीच खिल्ली उडविली आहे.

Leave a Comment