गुगलच्या अंडरवॉटर केबल्स शार्क चे खाद्य

shark
वॉशिंग्टन – सर्च इंजिन गुगल च्या समुद्राखालून गेलेल्या इंटरनेट केबल्सवर गेले कांही दिवस शार्क माशांकडून हल्ले केले जात असल्याचे दिसून आले आहे. शार्क भक्ष्य समजून या केबल्स चावत असल्याचे आणि त्यापासून बचाव करण्यासाठी नवीन प्रोजेक्टवर काम सुरू असल्याचे गुगलचे प्रॉडक्ट मॅनेजर डेन बेल्चर यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार अमेरिका, युरोप व जपान यांना जोडणार्‍या केबलवर शार्क हल्ले चढवित आहेत. गेली अनेक वर्षे हा प्रकार होत होता मात्र त्याचे प्रमाण अत्यल्प होते.१९८५ मध्ये कॅनरी आयलंड येथील समुद्रातील केबल्सवर शार्कच्या दातांचे चावे दिसून आले होते.या केबलमधून इलेक्ट्रीक मॅग्नेटिक किरणे ऊत्सर्जित होतात व त्यामुळे शार्क त्यांच्याकडे आकर्षित होतात. ऑप्टीक फायबर केबलवर शार्क हल्ले करण्याचे प्रमाण अधिक असल्याचेही समजते. तांब्याच्या वायरी असलेल्या केबल सहजी तुटत नाहीत.

केबल शार्कच्या चाव्यांपासून वाचविण्यासाठी बुलेट प्रूफ जॅकेट तसेच अंतराळात वापरण्यात येणार्‍या वस्तूंसाठी जे मटेरियल वापरले जाते त्यांचे कोटिंग करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या मेटेरियलचे नाव पॉली इथायलीन प्रोटेक्टीव्ह यार्न असे आहे. गुगलची जगात १.६० लाख किमी लांबीची अंडरग्राऊंड केबल आहे.

Leave a Comment