कर्णधारपदाच्या निर्णयासाठी प्रतिक्षा करा – धोनी

dhoni
लंडन – इंग्लंडविरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका भारतीय संघाने लाजिरवाण्या खेळीमुळे गमावली असून पाचव्या कसोटीच्या तिसर्‍या दिवशी इंग्लंडने एक डाव व 244 धावांनी भारताचा पराभव केल्यामुळे धोनीच्‍या कर्णधारपदावर प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. तेव्‍हा महेंद्रसिंह धोनीने ‘थांबा राजीनाम्‍याचा विचार करु नका, मी या पराभवातून सावरु शकतो का नाही याची वाट पाहा’ असे सांगितले आहे.

इंग्‍लंडने भारताविरुध्‍द 1974 नंतर सर्वांत मोठा विजय नोंदवला असून भारतीय संघाचे प्रदर्शन अतिशय लाजीवरवाणे राहिले आहे. भारतीय संघ 30 षटकेसुध्‍दा खेळू शकला नाही. भारताने लॉर्ड्सवर दुसरी कसोटी जिंकली होती. परंतु साउथम्‍टन, मँचेस्‍टर आणि ओवलवर भारताला लाजीरवाण्‍या पराभवाला सामोरे जावे लागले.

भारतीय संघातील दिग्गजांचा दुस-या डावातही फ्लॉप शो ठरला. भारतीय संघाने 46 धावसंख्या असतानाच आपल्या पाच विकेट गमावल्या. सलामीवीर मुरली विजय (2), गौतम गंभीर (3), चेतेश्वर पुजारा (11), अजिंक्य रहाणे (4) आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी (0) हे आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. भारताकडून विराट कोहलीने 20 आणि स्टुअर्ट बिन्नीने सर्वाधिक 25 धावांची खेळी केली. यासह या दोघांनी पराभवाचे मोठे अंतर पूर्ण केले.

Leave a Comment