आतापर्यंत दहीहंडी उत्सवात ४३ गोविंदा जखमी

dahi-handi4
मुंबई – मुंबई, ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीत आज सुरु आहे तो दहीहंडीचा माहोल. आज जिकडे तिकडे डिजेच्या तालावर थिरकरणारी पावले, उंचावर बांधलेली हंडी फोडण्यासाठी येणारे गोविंदा आणि दहीहंडीचा थरार रस्त्यावर थांबून अनुभवणारे सर्वसामान्य असे चित्र आहे मुंबापुरीत. या नादात आत्तापर्यंत 43 गोविंदा जखमी झाले असून जखमी गोविंदावर मुंबईतील नायर, सायन आणि केईएम आणि इतर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध हटवल्यामुळे गोविंदा पथकांमधील थरांची स्पर्धा यंदाही कायम असून आयोजकही गोविंदा पथकांना लाखो रुपयांचे आमिष दाखवत त्यांना आकर्षित करत आहेत. मात्र थरांची ही स्पर्धा गोविंदा पथकांसाठी पुन्हा एकदा वेदनादायीच ठरली आहे. मुंबईतील विविध ठिकाणी थरांवरुन कोसळून आत्तापर्यंत ४३ गोविंदा जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मुंबईतील केईएम, सायन आणि नायर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Leave a Comment