स्मार्टसिटी विकासात सिंगापूरचे सहकार्य मिळणार

sushama
सिंगापूर – भारतात १०० स्मार्टसिटींचा विकास करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून याकामी सिंगापूरचे सहाय्य घेतले जाणार असल्याचे समजते. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी नुकताच १ दिवसाचा सिंगापूर दौरा करून त्यासंबंधीची बोलणी केली आहेत.

सुषमा स्वराज यांच्या म्हणण्याप्रमाणे भारतातील शहरांचा कायाकल्प करण्यासाठी सिंगापूरची मदत गरजेची आहे. सिगापूरचे परराष्ट्रमंत्री आणि पंतप्रधान यांच्याशी स्वराज यांनी चर्चाही केली आहे आणि त्यांनी तांत्रिक सहाकार्याची तयारी दाखविली आहे. तसेच दोन्ही देशांतील व्यापार व गुंतवणूक यावरही चर्चा झाली आहे. सिंगापूरच्या कंपन्यांनी भारतात पायाभूत सुविधा क्षेत्रात मदत द्यावी अशी भारताची अपेक्षा स्वराज यांनी पंतप्रधान ली सीन लूंग यांच्याकडे व्यक्त केली आहे.

स्वराज यांनी सिंगापूर चेन्नई बंगलोर इंडस्ट्रीयल कॉरिडॉर मध्ये लिटील सिंगापूर विकसित करू शकते असेही सुचविले असून त्यावर विचार करण्याचे आश्वासन सिंगापूर सरकारने दिले आहे. गेल्या दशकात सिंगापूर आणि भारत यांच्यातील व्यापार १९.४ अब्ज डॉलर्सवर पोहोचला असून हवाई आणि समुद्रमार्गे दोन्ही देशातील दळणवळण वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

Leave a Comment