लाचखोरांचे फोटो झळकणार फेसबुकवर

facebook
मुंबई – महाराष्ट्र भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने लाचखोर अधिकार्‍यांचे फोटो फेसबुकवर प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला असून गेल्या दोन महिन्यांपासून असे फोटो प्रसिद्ध केले जात असल्याचे समजते. लाचखोरांचे फोटो फेसबुकवर टाकण्यामागे भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून नक्की काय कामगिरी बजावली जाते ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे हा हेतू असल्याचे विभागाचे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी सांगितले. या संदर्भात फेसबुकचे एक पेजच सुरू करण्याचा विचार भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

फेसबुकवर दर आठवड्याला एका लाचखोर अधिकार्‍याचा फोटा प्रसिद्ध केला जाणार आहे. त्याचबरोबर त्याने किती पैसे खाल्ले व त्यासंदर्भातली कागदपत्रे यांचीही माहिती दिली जाणार आहे. या वर्षात विभागाने ७४४ ठिकाणी छापे टाकले आहेत आणि १००९ अधिकारी व कर्मचार्‍याना अटक केली आहे. लाच खाणार्‍याच्या प्रमाणात गतवर्षीपेक्षा यंदा वाढ झाली आहे. गतवर्षी ३४८ ठिकाणी छापे टाकून ४५२ अधिकारी कर्मचारी अटकेत टाकण्यात आले होते.

Leave a Comment