महेलाला विजयी निरोप

mahela
कोलंबो – श्रीलंकेने महान क्रिकेटपटू महेला जयवर्धनेला सोमवारी पाकिस्तान विरुध्दचा दुसरा कसोटी सामना जिंकून विजयी निरोप दिला. पाकिस्तान विरुध्दची दोन कसोटी सामन्यांची मालिका श्रीलंकेने २-०ने जिंकली.

रंगना हेरथ श्रीलंकेच्या विजयाचा नायक ठरला असून त्याने दुस-या डावातही पाच बळी मिळवले. पहिल्या डावात हेरथने नऊ गडी बाद केले होते. या कसोटी सामन्यात हेरथने एकूण चौदा गडी बाद केले.

श्रीलंकेला या सामन्यात महेला जयवर्धनेला विजयी निरोप देण्यासाठी विजय आवश्यक होता. जयवर्धनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याचा हा अखेरचा कसोटी सामना होता. या कसोटीत पहिल्या डावात जयवर्धनेने चार तर दुस-या डावात ५४ धावा केल्या.

श्रीलंकेने पहिल्या डावात ३२० धावा केल्या होत्या. पाकिस्तानने निसटती बारा धावांची आघाडी घेत ३३२ धावा केल्या. श्रीलंकेचा दुसरा डाव २८२ धावांवर संपुष्टात आला. पाकिस्तानसमोर विजयासाठी २७१ धावांचे आव्हान होते. श्रीलंकेच्या फिरकीसमोर पाकिस्ताचा डाव गडगडला आणि दुसरा डाव १६५ धावांवर संपुष्टात आला. श्रीलंकेने हा सामना १०५ धावांनी जिंकला. रंगना हेरथने सामनावीर आणि मालिकावीराचा पुरस्कार पटकावला.

Leave a Comment