भूकंपच्या धक्क्याने हादरले पश्चिम इराण

iran
तेहरान – सोमवारी ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का इराणच्या पश्चिम भागाला बसला असून काही जण जखमी झाले तर काही ठिकाणांचे नुकसान झाले आहे. मात्र या भूकंपामुळे अद्याप कोणतीही जिवितहानी झाली नसल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली.

इराणमध्ये झालेला भूकंप हा ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता तर इलाम भागापासून १० किलोमीटर अंतरावर या भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याची माहिती अमेरिकन भूर्गभ विभागाने दिली. सकाळी ७.०२ मिनिटाच्या सुमारास हा भूकंप झाला. यामात्र या भूकंपामुळे कोणतीही जिवितहानी झाल्याचे अद्याप वृत्त नाही. या भूकंपामुळे काही जण जखमी झाले तर काही ठिकाणचे नुकसान झाले. अबादान शहरातील ४० जखमींना बाहेर काढण्यात तेथील बचावपथकाला यश आले आहे.

याआधी गेल्यावर्षी एप्रिलमध्ये झालेल्या ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यामुळे दक्षिणपूर्व इराण आणि पाकिस्तानमधील ४० जणांचा मृत्यू झाला होता.

Leave a Comment