फेडरर आणि सेरेनाने जिंकली सिनसिनाटी स्पर्धा

sarena
मॅसॉन(ओहिओ) – सोमवारी डेविड फेररला नमवत सहाव्यांदा सिनसिनाटी एटीपी मास्टर्स टेनिस स्पर्धेचे जेतेपद स्विर्त्झलंडचा दुसरा सीडेड रॉजर फेडररने पटाकवले. तर पहिल्यांदाच सेरेना विल्यम्सने महिलांच्या डब्लूटीए स्पर्धेचे जेतेपद मिळवले.

सहावा सीडेड स्पेनच्या डेव्हिड फेररला अंतिम फेरीत फेडररने ६-३, १-६ आणि ६-२ या सेटमध्ये पराभूत केले. या विजयासोबतच त्याने सहाव्यांदा या स्पर्धेचे जेतपद मिळवण्याचा मान मिळवला आहे. तर कारकीर्दीतील ८०वे जेतेपद त्याने पटकावले आहे.

तर दुसरीकडे महिला डब्लूटीए स्पर्धेत नववी सीडेड सर्बियाची अॅना इवानोविचचा सेरेना विल्यम्सने ६-४ आणि ६-१ या सरळ सेटमध्ये पराभव करत या विजयावर शिक्कामोर्तब केले. सेरेनाला यापूर्वी पाच वेळा जेतेपदाने हुलकावणी दिली होती. त्यामुळे यावेळी ती जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरली होती. याआधी उपांत्यफेरीत तिने तिने आठवी सीडेड सर्बियाच्या येलेना यांकोविचचा ६-१, ६-३ पराभव केला होता.

Leave a Comment