जगातला पहिला स्मार्टफोन सिमॉन

simon
स्मार्टफोन जगात गेल्या वीस वर्षात काय क्रांती झाली याची माहिती हवी असेल तर पहिला स्मार्टफोन पाहायला हवा. जगातला पहिला स्मार्टफोन सिमॉन नुकताच २० वर्षांचा झाला. १६ ऑगस्ट १९९४ रोजी पहिला स्मार्टफोन विकला गेला होता आणि त्याचे नांव होते आयबीएम सिमॉन. अर्थात त्यावेळी त्याला स्मार्टफोन असा शब्द मात्र वापरला गेला नव्हता. विशेष म्हणजे या काळापर्यंत भारतात मोबाईल फोनही वापरात आलेले नव्हते.

या पहिल्यावहिल्या स्मार्टफोनची किंमत त्याकाळात होती ९०० डॉलर्स म्हणजे ५४८०५ रूपये. विशेष म्हणजे त्यावेळी तो दोन वर्षांच्या कॉट्रॅक्ट बेसिसवर मिळत होता. युजरचे काम हलके आणि सोपे करणारा म्हणून त्याला त्याकाळी सिमॉन असे नांव दिले गेले होते. आयबीएम आणि अमेरिकन सेल्युलर कंपनी बेलसाऊथ यांनी मिळून हा फोन बनविला होता. त्याकाळात ५० हजार फोन विकले गेले होते.

जवळजवळ अर्धा किलो वजनाच्या या स्मार्टफोनचे रूपडे फारसे आकर्षक नव्हते. ४.५ इंचाचा हिरव्या रंगाचा एलसीडी डिस्प्ले असलेला स्क्रीन त्याला देण्यात आला होता आणि टच स्क्रीन तंत्रज्ञानाचा वापर प्रथम याच उपकरणात केला गेला होता. २३ सेंमी लांबीचा हा फोन १ तासाच्या बॅटरीबॅकअप सह होता. मात्र त्याला देण्यात आलेली फिचर्स अगदी लिमिटेड होती. अर्थात मॅपिग, स्पेडशीट, ईमेल, कॅलेंडर, नोट साठविणे, कॅल्क्युलेटर, घड्याळ अशा सुविधा त्यात होत्या.

हा फोन आक्टोबरपर्यंत लंडनच्या सायन्स म्युझियम मध्ये प्रदर्शनासाठी ठेवला जाणार आहे.

Leave a Comment