केंब्रिजला हवेत चॉकलेटचे डॉक्टर

chocolate
आजारी लोकांसाठी डॉक्टर हवे असणे आपण समजू शकतो. पण चॉकलेटसाठी डॉक्टर? होय. तुम्ही कांहीही चुकीचे ऐकलेले नाही. केंब्रिज विश्वविद्यालयाने चॉकलेट साठी संशोधन करणारे संशोधक हवेत अशी जाहिरातच दिली असून या संशोधकांना साडेतीन वर्षाच्या पीएचडीसाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

चॉकलेट हा जगभरातील जनतेचा आवडता पदार्थ युरोपिय देशांत आणि अमेरिकेत विशेष लोकप्रिय आहे. स्वित्झर्लंड सारख्या अनेक देशांनी चॉकलेट बनविण्यात विशेष कौशल्य आत्मसात केले आहे. मात्र तरीही जरा उकाडा वाढला की हे चॉकलेट वितळू लागते आणि मग चॉकलेट खाण्याची मजाच राहात नाही.

केब्रिजने यासाठीच डॉक्टरेट पदवी देण्याची जाहिरात दिली असून यासाठी प्रवेश घेणार्‍या संशोधकांना गरम हवेतही चॉकलेट वितळू नये व मूळ स्वरूपातच राहावे यासाठी काय करावे लागेल याचे संशोधन करायचे आहे. याचा सर्वाधिक फायदा चॉकलेट कंपन्यांना होणार आहे. २९ ऑगस्ट ही या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. मात्र केवळ युरोपिय देशांचे नागरिकच या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

Leave a Comment