जाण्यासाठी रस्ता नसलेले इक्विटोस शहर

iouitos
अॅमेझॉनच्या विशाल जंगलातील व पेरू देशातल्या पर्जन जंगलात वसलेले सर्वात मोठे शहर इक्विटोस हे रस्तामार्गाने न जाता येणारे मोठे व जगातील पहिले मोठे बंदर आहे. नॅने आणि इटाया या नद्यांच्या संगमावर वसलेल्या या शहराच्या एकीकडे आहे अॅमेझॉनचे दाट जंगल तर दुसरीकडे आहे फक्त पाणी. तरीही या शहराची लोकसंख्या चार लाखांहून अधिक आहे.

इक्विटोसला जायचे असेल तर विमानाने तरी जावे लागते किवा नावेने. असह्य उकाड्याला तोंड देत आठवडाभर नावेतून प्रवास केल्यानंतर या शहरात पोहोचता येते. हे शहर युरोपियन मिशनरींनी १८ व्या शतकांत वसविल्याचे सांगितले जाते. मात्र येथे शहर नसले तरी हजारो वर्षांपासून लोक येथे राहात होते. हे स्थानिक लोक आजही येथे आहेत. नदीकाठच्या छोट्या छोट्या वस्त्यांतून ते आजही राहतात. शिकार हा त्यांचा प्रमुख व्यवसाय.

असे सांगितले जाते की १९ व्या शतकाच्या सुरवातीला रबराचा शोध लागल्यानंतर येथे असलेल्या रबराच्या हावेने युरोयिपन येथे आले. येथील स्थानिक महिलांशी लग्ने लावून तिथले नागरिक बनले आणि रबराच्या उद्योगात त्यांनी चांगलाच जम बसविला. आज हे लोक येथे रबर टायकून बनले आहेत. या शहराचे विशेष म्हणजे मोटरसायकलींचे प्रमाण लक्षणीय आहे तसेच रिक्षांचे प्रमाणही खूप आहे.

जंगलातील सैर आणि या अनोख्या शहराचा अनुभव घेण्यासाठी इकडे पर्यटकांची पावलेही वळू लागली आहेत. २०१२ सालात येथे अडीच लाख पर्यटकांनी भेट दिल्याचे आकडेवारी सांगते. जायला रस्ता नसलेल्या या शहराची सफर ही अद्भूत वाटावी अशीच खरी.

Leave a Comment