सोलापूरकरांचे ऋण फेडणार विकासकामांनी – पंतप्रधान

modi3
सोलापूर : सोलापूरकरांनी आज मला जे प्रेम दिले त्या प्रेमाचा मी ऋणी असून त्यांचे हे ऋण मी विकासाच्या माध्यमातून फेडणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 आणि रायचूर ट्रान्समिशन लाईन राष्ट्राला अर्पण केले त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय उर्जामंत्री पियूष गोयल, राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजपा नेते विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस, खासदार शरद बनसोडे यांच्यासह आदी उपस्थित होते.

केंद्र सरकार लवकरच पालखी मार्गाचे 4 पदरी काँक्रिटिकरण करण्याचा आणि विविध तिर्थक्षेत्रांना राष्ट्रीय महामार्गांनी जोडण्याचा निर्णय निर्णय घेणार असल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितले. राज्यातील बंद पडलेल्या वीज प्रकल्पांसाठी कोळसा आणि गॅसची मागणी असून हे प्रकल्प सुरु झाल्यास महाराष्ट्राचा उद्योग क्षेत्रांतील प्रथम क्रमांक अबाधित राहील असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले. तसेच केंद्राने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 कोकणाला जोडण्यासाठी सह्याद्रीच्या पायथ्याशी बोगदा तयार करण्यासाठी मदत करण्याची मागणी केली.

Leave a Comment