सोडियमचा अतिरेकाने १६ लाख लोकांचा मृत्यू

sodium
वॉशिंग्टन – आपल्या आहारामध्ये काय काय असावे याची चर्चा आपण नेहमीच करतो. त्यामध्ये स्निग्ध पदार्थ, कर्बोदके, उष्मांक, प्रथिने यावरच भर दिलेला असतो. परंतु आपल्या शरीराला सोडियम, आयोडिन, लोह, सुवर्ण अशी सूक्ष्म अन्नद्रव्ये सुद्धा आवश्यक असतात. ती दिवसाला एक किंवा दोन ग्रॅम किंवा काही बाबतीत तर वर्षाला पाच ग्रॅम इतक्या सूक्ष्म प्रमाणात लागत असतात. मात्र त्यांचा थोडासाही अभाव निर्माण झाला की, त्याचे परिणाम मोठे होतात. प्रकृती बिघडते. नेहमीच्या पद्धतीने तपासणी केली तरी सूक्ष्म द्रव्यांचा अभाव असल्यामुळे बिघाड झाला असेल अशी शक्यता कोणी गृहित धरत नाही आणि शेवटी कारण कळतच नाही. म्हणून सूक्ष्म द्रव्याचा कोणताही अभाव शरीरात निर्माण होऊ नये याबाबत कमालीचे दक्ष असले पाहिजे.

या सूक्ष्म द्रव्याच्या अभावाने जसे आरोग्य बिघडते तसेच ते अतिरेकाने सुद्धा बिघडू शकते. सोडियमचा अतिरेक झाला की, थेट मृत्यूशी गाठ असते. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने दर दिवशी प्रत्येकाच्या खाण्यात दोन ग्रॅम सोडियम असावे असे ठरवून दिलेले आहे. परंतु या संबंधात १८७ देशांमध्ये पाहणी केली असता सोडियमच्या वापराचे प्रमाण ठरवून दिलेल्यापेक्षा जवळजवळ दुप्पट असल्याचे आढळले आहे. या देशातील नागरिक दररोज ३.९५ ग्रॅम सोडियम खातात.

या अति वापरामुळे अनेक प्रकारचे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. त्यात प्रामुख्याने रक्तदाब वाढणे या आजाराचा समावेश आहे. त्याशिवाय अन्यही काही परिणाम आहेत आणि जगभरामध्ये दररोज १६ लाख लोक या सोडियमच्या अति वापरामुळे मरण पावतात असे आढळले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment