राज्यातील पहिली मोफत वायफाय सीटी झाली कणकवली

nitesh-rane
कणकवली – महाराष्ट्र राज्यातील पहिले वायफाय शहर कणकवली शहर हे म्हणून आज सज्ज झाले आहे. ही वायफाय सेवा सिंधुदुर्ग जिल्हयात सर्वत्र काँग्रेसचे युवा नेते नितेश राणे यांच्या संकल्पनेतून उपलब्ध करून दिली जाणार असून ज्याची सुरुवात कणकवलीपासून झाली.

उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते या सेवेचा प्रारंभ करण्यात आला. तरुण युवक युवतींनी या आधुनिक तंत्राद्वारे जगातील ज्ञान आत्मसात करावे. या तंत्राद्वारे स्वत:च्या आर्थिक सक्षमतेचाही मार्ग शोधावा व टॅलेन्ट मिळवून देश महासत्ता करा असे आवाहन यावेळी उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले.

या कार्यक्रमास नितेश राणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जि. प. अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, उपाध्यक्ष गोटय़ा सावंत, नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत, मालवण नगराध्यक्ष अशोक तोडणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment