भास्कर जाधवांविरोधात विधानसभा लढवणार निलेश राणे

nitesh-rane1
रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करल्यानंतर थेट अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय माजी खासदार निलेश राणे यांनी घेतला आहे. एवढेच नाही तर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने धोका दिल्यामुळे राष्ट्रवादीचे मंत्री भास्कर जाधव यांनाच आव्हान देण्याचे निलेश राणेंनी जाहीर केले आहे.

गुहागर मतदार संघातून विद्यमान कामगार मंत्री असलेले भास्कर जाधव हे निवडणूक लढवतात. त्यांच्याविरोधात थेट गुहागरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याचे निलेश राणे यांनी आज जाहीर केले.

निलेश राणे यांचा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभा निवडणुकीत पराभव केला. त्यामुळे आघाडीत आता लोकसभा निवडणुकीच्या उट्टे काढण्यात सुरुवात झाल्याचे चित्र आहे.

Leave a Comment