बेपत्ता विमानातील प्रवाशांच्या बँकेतून २० लाखांची चोरी

maleshiya
क्वालालंपूर – मलेशियन एयरलाईन्सच्या ८ मार्च २०१४ रोजी रहस्यमय रित्या बेपत्ता झालेल्या एमएच ३७० विमानातील चार प्रवाशांच्या बँकेतून २० हजार पौंडांची रक्कम काढून घेण्यात आल्याचा प्रकार नुकचाच उघडकीस आला आहे.

या संदर्भात माहिती देताना गुन्हा अन्वेषण विभागाचे उपायुक्त इजानी अब्दुल गनी म्हणाले की बेपत्ता झालेल्या विमानाचा शोध अजूनही हिंद महासागरात घेतला जात आहे.१८ जुलै रोजी या विमानातील चार प्रवाशांच्या खात्यातून १११००० मलेशियाई रिग्गत म्हणजे अंदाजे २० लाख रूपये काढून घेतले गेल्याचे उघडकीस आले आहे. या विमानातील तीन प्रवाशांच्या खात्यातून काढलेली रक्कम चौथ्या प्रवाशाच्या खात्यात ट्रान्स्फर केली गेली आणि नंतर ती लँग व्हॅलीतील विविध एटीएम मशीनमधून काढली गेल्याचे लक्षात आले आहे. या संदर्भात पोलिस तपास सुरू असून बँकांकडे सीसीटिव्हीचे फूटेज मागितले गेले आहे असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment