फ्लिपकार्टचे ४०० कर्मचारी कोट्याधीश

flip
बंगलोर – देशातील सर्वात मोठी ऑनलाईन रिटेल कंपनी फ्लिपकार्टचे ४०० कर्मचारी गेल्या दहा वर्षात कोट्याधीश बनले असल्याचे वृत्त आहे. कंपनीच्या मूल्यांकनात गेल्या दोन वर्षात झालेल्या भरघोस वाढीमुळे ही किमया साध्य झाली असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार फ्लिपकार्टचे मूल्यांकन केल्या दोन वर्षात आठपटीने वाढले आहे. कंपनीच्या बर्‍याच कर्मचार्‍यांकडे कंपनीचे शेअर्स आहेत. त्यातील २० हून अधिक कर्मचारी वरीष्ठ उपाध्यक्ष किवा त्यापेक्षाही वरच्या पोस्टवर कार्यरत आहेत. कांही जणांनी तर दोन वर्षांपूर्वीच कंपनी जॉईन केली आहे. त्यांच्याकडे कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात आहेत व आता शेअरचा भाव वाढल्याने हे कर्मचारी कोट्याधीश झाले आहेत.

कंपनीत एकूण १४ हजार कर्मचारी असून त्यातील ७ ते ८ हजार कर्मचारी पूर्णवेळ काम करतात. त्यातील कंपनीचे स्टॉक असलेल्या कर्मचार्‍यांची संख्या २ हजार आहे. मे २०१४ मध्ये कंपनीचे मूल्यांकन २.६ अब्जांवर होते ते दोन महिन्यात म्हणजे जुलै २०१४ मध्ये ०.७ अब्जांनी वाढले असल्याचेही समजते.

Leave a Comment