एटीएमसह खात्याची मोफत माहिती आणि चेकबुक रिक्वेस्टही महाग

atm
नवी दिल्ली – यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासून तुम्ही तुमच्या बँक एटीएममधून प्रत्येक महिन्यात केवळ 5 आणि इतर बँक एटीएममधून 3 ट्रँजेक्शन मोफत करू शकाल. त्यानंतर एटीएममधून प्रत्येक ट्रँजेक्शनसाठी तुम्हाला 20 रुपये द्यावे लागतील. हे पैसे तुमच्या खात्यातून कापले जातील. ट्रँजेक्शनमध्ये केवळ पैसे काढणे एवढेच नाही तर खात्याची माहिती, चेकबुक रिक्वेस्ट आणि मोबाइल रिचार्जचा व्यवहार ग्राह्य धरला जाईल.

हा नियम देशातील सहा मेट्रो दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळूरू, कोलकाता आणि हैदराबाद शहरात रिझर्व्ह बँकेच्या अनुमतीने लागू होणार असून छोट्या, बेसिक खाते धारकांच्या खात्यावर हा नियम लागू होणार नाही असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. देशातील सहा मेट्रो शहरांव्यतिरिक्त इतर शहरांमध्ये हा नवीन नियम लागू होणार नाही.

Leave a Comment