आयएनएस कोलकाता राष्ट्राला समर्पित

modi
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी स्वदेशी बनावटीची आयएनएस कोलकाता ही विनाशिका राष्ट्राला समर्पित केली असून हा कार्यक्रम मुंबईत पार पडला. नौदलाचे जनक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्या भाषणामध्ये मोदींनी स्मरण केले.
modi1
भारतात आयएनएस कोलकाताची निर्मिती झाली असून आपण स्वयंपूर्ण होत असल्याचे हे चिन्ह आहे. आता आपल्याकडे कोणी वाकडया नजरेने पाहण्याची हिंमत करणार नाही. आयएनएस कोलकातामुळे सैन्यदलांचा आत्मविश्वास उंचावणार आहे त्याचवेळी युवकांनाही प्रेरणा मिळेल असे मोदी म्हणाले.
modi2
आज युध्दसामुग्री आयात करणारा भारत असून आम्ही भारताला युध्दसामुग्री निर्यात करणारा देश बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. देशाच्या संरक्षणासाठी अर्थसंकल्पात अनेक तरतुदी केल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. माझगाव डॉकमध्ये शनिवारी झालेल्या या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री अरुण जेटली, नौदल प्रमुख आर.के.धोवन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्यपाल के.शंकरनारायणन आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल उपस्थित होते.

Leave a Comment