21 ऑगस्टला येणार राज ठाकरेंची ब्लू प्रिंट

raj-thackrey
मुंबई : आता 21 ऑगस्टचा मुहूर्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ब्लू प्रिंटला निघाला असून प्रसिध्द उद्योजक रतन टाटा आणि मुकेश अंबानी या ब्लू प्रिंटच्या प्रकाशान समारंभासाठी उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे.

या ब्लू प्रिंटमध्ये या नऊ मुद्यांचा समावेश करण्यात आला असून त्यात रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता, आरोग्य, ग्रामविकास, महिला सुरक्षा, शिक्षण, कृषी आणि आर्थिक स्थैर्य या बाबींचा समावेश प्रामुख्याने केला गेल्याचे समजते. मनसेच्या ब्लू प्रिंटची गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षा होती. अखेर 21 ऑगस्ट रोजी ही ब्लू प्रिंट सादर होणार आहे. यानंतर 27 ऑगस्ट रोजी मनसेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment