सॅमसंगचा लेटेस्ट गॅलेक्सी अल्फा सादर

alpha
मास्को – सॅमसंगने त्यांच्या गॅलेक्सी मालिकेतील अल्फा हा लेटेस्ट मेटॅलिक स्मार्टफोन बुधवारी मास्को येथे सादर केला आहे. कंपनीने इव्होल्युशन ऑफ गॅलॅक्सी डिझाइनच्या टॅगने सादर केलेला हा स्मार्टफोन गॅलेक्सी एस ५, एलजी जी ३, आयफोन ५ एस यांच्याशी तगडी स्पर्धा करेल असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.

समॅसंगने अल्फासाठी ४.७ इंची स्क्रीन दिला असून त्याला फोर जी एलटीई सपोर्ट दिला गेला आहे. बाजारातील अन्य महागड्या स्मार्टफोनप्रमाणेच सर्व सुविधा या फोनलाही आहेत. कंपनी एका पाठोपाठ एक अशा १५० देशांत हा फोन लाँच करणार आहे. भारतात तो कधी येईल आणि त्याची किंमत किती असेल याचा कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. सप्टेंबरपासून या फोनची विक्री सुरू होणार आहे.

या फोनची जाडी ६.७ मिमी, वजन ११५ ग्रॅम, ३२ जीबीची इंटरनल मेमरी, १२ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि २.१ पिक्सलचा फ़्रट कॅमेरा अशी अन्य वैशिष्ठ्ये आहेत. जाणकारांच्या मते या फोनची किंमत ४२ ते ४५ हजारांदरम्यान असेल. मात्र या फोनची मेमरी वाढविण्याची सुविधा दिली गेली नाही व ही त्यातील कमी म्हणता येईल.

Leave a Comment