नारायण राणे काँग्रेस प्रचार समिती अध्यक्षपदी

rane
मुंबई – काँग्रेस श्रेष्ठींवर आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर नाराजी राग आळवणारे उद्योग मंत्री नारायण राणे यांची काँग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे तर दुसरे नाराज नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर विधानसभा निवडणुकांसाठीच्या समन्वय समितीच्या अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे.

नारायण राणे यांना दिल्ली भेटीत प्रचार समिती अध्यक्षपद दिले जाईल असे वचन दिले गेले होते ते पक्षाने पूर्ण केले आहे असे अंतर्गत सूत्रांकडून समजते. माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर जाहीरनामा समितीचे अध्यक्षपद सोपविले गेले आहे. मात्र सर्व समित्यांवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे सदस्य म्हणून राहणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार ३३ सदस्यीय प्रचार समितीत आमदार अनंतराव थोपटे, आ.रोहिदास पाटील, खासदार रजनी पाटील आणि माजी खासदार मिलींद देवरा यांचा समावेश आहे. समन्वय समितीत मुकुल वासनिक, मुरली देवरा, गुरूदास कामत, पतंगराव कदम व हुसेन दलवाई या आजी माजी खासदार आमदारांचा समावेश आहे.३९ सदस्यीय जाहीरनामा समितीत बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखेपाटील, नितीन राऊत या आजी माजी आमदारांचा व प्रवक्ते अनंत गाडगीळ यांचा समावेश आहे. शिवाय निवडणुक समितीचे अध्यक्ष म्हणून माणिकराव ठाकरे यांची तर मिडीया समितीचे अध्यक्ष म्हणून हर्षवर्धन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Comment