सेक्स जिहाद मुळे चीनी सरकार हादरले

isis
बिजिग – चीनच्या शिनजियांग प्रांतात सेक्स जिहादने एकच गोंधळ माजविला असल्याने येथील व्यवस्थापन हादरले आहे. या संबंधी वेबसाईटवरून आवाहन करण्यात आले असून त्याचा उगम नक्की कोठे आहे याचा तपास चिनी पोलिस विभाग घेत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ट्वीटरप्रमाणे सीना विबो ही वेबसाईट अतिशय लोकप्रिय आहे. या साईटवरूनच सिरीया आणि इराक येथे लढत असलेल इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांच्या गरजा पुर्‍या करण्यासाठी मुलींनी यावे असे आवाहन केले गेले होते. बिवोने ही पोस्ट सोमवारी काढून टाकली असली तरी शिक्षण घेत असलेल्या अनेक विद्यार्थीनींना या संदर्भात फोन येत आहेत.

अनेक मुलींना असे फोन आत्तापर्यंत आले आहेत. अभ्यास सोडा आणि इस्लामी दहशतवाद्यांची सेवा करा असा मजकूर पोस्ट करण्यात आला होता व तो अतिशय जलद वेगाने लोकप्रिय झाला असल्याचेही समजते. इतकेच नव्हे तर ही पोस्ट २००० वेळा रिपोस्ट केली गेली. मुलींना येत असलेल्या फोनवरून इंडोनेशियाच्या मार्गाने सिरीयात या, दहशतवाद्यांना स्वतःला समर्पित करा असे सांगितले जात आहे. मात्र धर्माविरूद्ध जाण्याची इच्छा नसल्याने या मुलींना त्या संदर्भात पोलिस तक्रार केलेली नाही.

शिनजियांग प्रांतातील पोलिसांनी मात्र हे प्रकरण गंभीरपणे घेतले असून या मुलींचे नंबर संबंधितांपर्यंत पोहोचले कसे याचा तपासही केला जात आहे असे समजते.

Leave a Comment