लंडन रियल इस्टेट गुंतवणुकीत भारतीयांची आघाडी

london
लंडन – मध्यवर्ती लंडन मधील रियल इस्टेट व्यवसायात दुसर्‍या तिमाहीत झालेल्या एकूण गुंतवणुकीपैकी निम्मी गुंतवणूक भारतीय व्यावसायिकांनी केली असल्याचा अहवाल जगातील बड्या व्यावसायिक रियल इस्टेट सेवा व गुंतवणूक फर्म सीबीआरई ने दिला आहे. दुसर्‍या तिमाहीत रियल इस्टेट क्षेत्रातील भारतीय व्यावसायिकांनी तब्बल २४१ दशलक्ष पौंडांची गुंतवणूक केली असून हा हिस्सा एकूण गुंतवणुकीच्या ५५ टक्के इतका आहे. विशेष म्हणजे २०१३ सालात रियल इस्टेट व्यवसायातील कोणाही भारतीयांनी लंडनमधील व्यवसायात गुंतवणुक केलेली नाही.

सीबीआरईचे कार्यकारी संचालक पीटर बर्नस यांनी दिलेल्या माहितीनुसार देशाची अर्थव्यवस्था गतीमान होत चालली आहे व त्यामुळे निवासी घरांसाठी मागणीही वाढती आहे. साऊथ बँक आणि वेस्ट लंडन येथे ग्राहकांकडून मागणी चांगली असल्याने या क्षेत्रातील गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. दुसर्‍या तिमाहीत इंडिया बुल्सने २२ हॅनोव्हर स्क्वेअर येथे १५५ दशलक्ष पौडांची गुंतवणूक केली असून हा या काळातला सर्वात मोठा व्यवहार आहे. त्या पाठोपाठ लोढा ग्रुपने कॅरि स्ट्रीट येथे ९० दशलक्ष पौंडांची गुंतवणूक केली आहे. या दोन्ही कंपन्या येथे निवासी इमारतीच उभारणार आहेत.

Loading RSS Feed

Leave a Comment