पद्म पुरस्कारासाठी धोनी, विराटची शिफारस

virat
नवी दिल्ली – भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारासाठी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची शिफारस करण्यात आल्याबाबत तर्कवितर्क सुरू असतानाच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि फलंदाज विराट कोहली यांची पद्म पुरस्कारासाठी बीसीसीआयने शिफारस केल्याचे माध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

धोनी आणि विराटची अनुक्रमे पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारासाठी बीसीसीआयने शिफारस केली असून याशिवाय भारताच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजचे नाव पद्मश्री पुरस्कारासाठी पाठविण्यात आले आहे. धोनीला २००९ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पद्मभूषण हा भारतरत्न आणि पद्मविभूषणनंतर तिसर्‍या क्रमाकांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.