आतापर्यंत दहा लाख लोक इबोलाने बाधित

ebola
संयुक्त राष्ट्र- जागतिक आरोग्य संघटनेने पश्चिम आफ्रीकेतील १० लाखांपेक्षा जास्त लोकांना इबोलाने बाधित असल्याचे म्हटले आहे. तसेच या आजारावर ‘त्वरीत उपचार’ कोणताही नसल्याने इबोला या व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी तातडीने काही ‘विशेष उपाय’ करणे आवश्यक असल्याचे आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालानुसार, १० आणि ११ ऑगस्ट या दोन दिवसात गिनी, लायबेरिया, नायजेरिया आणि सिरिया लियोन या देशांमध्ये १२८ लोकांना इबोला व्हायरसची लागण झाली. त्यातील ५६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. या व्हायरसची एकूण १९७५ लोकांना लागण झाली असून आतापर्यंत १०६९ लोकांचा मृत्यू झाला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमूख मार्गारेट चॅन यांनी पश्चिम आफ्रीकेत १० लाखांपेक्षा जास्त लोकांना इबोला व्हायरसची लागण झाल्याचे सांगितले. त्यांना जेवणासह दैनंदिन गरजेसाठी आवश्यक असणारी सर्व मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले. या रोगावर कोणताही उपचार नाही. त्यामुळे या व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी जर अधिक वेगाने प्रयत्न केले गेले नाहीत, तर हा आजार रौद्ररूप धारण करू शकतो, अशी भिती चॅन यांनी व्यक्त केली.

Leave a Comment