मोदींचे अभूतपूर्व स्वागत करणार इंडो अमेरिकन संस्था

modi4
वॉशिग्टन – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेत ऐतिहासिक स्वागत करण्यासाठी ३०० हून अधिक इंडो अमेरिकन संस्था एकत्र आल्या आहेत. या संस्थांनी एकत्र येऊन इंडो अमेरिकन कम्युनिटी फौंडेशनची स्थापना केली आहे. अमेरिकन लॉ मेकरनी मोदींच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही या संस्थांनी केले असल्याचे समजते.

न्यूयॉर्क शहरातील ऐतिहासिक मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये २८ सप्टेंबरला मोदींचे भाषण होणार आहे. त्यासंदर्भातली अधिकृत घोषणा अद्यापी झालेली नसली तरी इंडो अमेरिकन संस्थांनी त्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. या भाषणासाठी १८ ते २० हजार लोक मावू शकतील अशी व्यवस्था केली गेली आहेच पण या भाषणाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन वाहिनीवरून १२ मोठया शहरातून केले जाणार आहे असे समजते. यात वॉशिग्टन डीसी बरोबरच शिकागो, हुस्टन, बोस्टन, टंपा, लॉस एंजेलिस, सिलीकॉन व्हॅली या शहरांचा समावेश आहे.

भारताच्या पंतप्रधानांची अमेरिकेतील ही सर्वात मोठी सार्वजनिक सभा ठरणार आहे तसेच अमेरिकन भूमीवर परदेशी नेत्याचे स्वागत इतक्या मोठ्या प्रमाणावर केले जाण्याचीही ही पहिलीच घटना ठरणार आहे या सभेला मोठ्या संख्येने अमेरिकन लॉ मेकर उपस्थिती लावणार आहेत. या भेटीच्या तयारीची पाहणी करण्यासाठी संघातून नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले भाजपचे राष्ट्रीय सचिव राम माधव अमेरिकेला रवाना झाले आहेत.

Leave a Comment