यंदा खेलरत्न नाही; १५ नावांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

arjun-purskar
नवी दिल्ली – यंदा कोणालाच क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळणार नसून अव्वल क्रीडापटूंना अर्जुन पुरस्कार मिळावा यासाठी निवड समितीने क्रिकेटपटू रविचंद्रन अश्‍विनसह १५ क्रीडापटूंच्या नावांची शिफारस केली आहे.

विश्‍व विख्यात क्रिकेटपटू कपिलदेव निखंज यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी थाळीफेकपटू विकास गौडा व कृष्णा पुनीया, बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, गोल्फर जीव मिल्खासिंग यांच्यासह एकूण आठ नावे समोर आली. त्यातील जीव मिल्खासिंग व पी. व्ही. सिंधू या दोन खेळाडूंमध्ये पुरस्कारासाठी चुरस होती. पण त्यांनी बजावलेल्या कामगिरीवर निवड समिती शिक्कामोर्तब करण्यास समाधानी नव्हती. क्रीडापटूंची कामगिरी छान असली तरी राजीव गांधी खेलरत्नसाठी भरीव कामगिरी झालेली नाही असे मत निवड समितीने नोंदविल्याचे कळते.

अर्जुन पुरस्कारासाठी रविचंद्रन अश्‍विन (क्रिकेट), हीना सिंधू (पिस्तुल नेमबाज), अभिषेक वर्मा (आर्चरी), टिंटु लुका (ऍथलेटिक्स), जय भगवान (बॉक्सिंग), सुनील राणा (ग्रीको रोमन कुस्ती), रेणुबाला चानू (भारोत्तोलन), टॉम जोसेफ (व्हॉलिबॉल), साजी थॉमस (रोईंग), ममता पुजारी (कबड्डी), अनिर्बाण लाहिली (गोल्फ), गीतू ऍन जोस (बास्केटबॉल), एच. एन. गिरीशा (पॅरा ऑलिम्पिक), व्ही. दिजू (बॅडमिंटन), अनका अलंकमणी (स्क्वॉश) यांच्या नावांची शिफारस केल्याचे एका सुत्राकडून सांगण्यात आले.

Leave a Comment