भारतीय वंशाच्या दोन शास्त्रज्ञांना प्रतिष्ठेचे गणितीय पुरस्कार

maths
सेऊल – आंतरराष्ट्रीय गणितीय संघातर्फे दिला जाणारा गणितीय क्षेत्रातील कामगिरीसाठी प्रतिष्ठेचा पुरस्कार यंदा आठ गणितज्ञांना जाहीर झाला आहे आणि या पुरस्कारासाठी दोन भारतीयवशांच्या गणितज्ञांचा समावेश आहे.

प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी मंजूल भार्गव आणि सुभाष खोत या दोन भारतीय वंशाच्या गणितज्ञांची निवड झाली असून फिल्ड मेडल मंजूल भार्गव यांना तर रोल्फ नेवालिना पुरस्कार सुभाष खोत यांना जाहीर झाला आहे. गणितीय क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार फिल्ड मेडल हा समजला जातो. फिल्ड मेडल हा गणितामधील नोबेल पुरस्कार समजला जातो.

दर चारवर्षातून एकदा भरणा-या आंतरराष्ट्रीय काँग्रेस गणितीय परिषदेमध्ये हा पुरस्कार जाहीर होतो. एकावेळी दोन किंवा चार जणांचीच या पुरस्कारासाठी निवड करता येते. ४० वर्ष वयाच्या आतील व्यक्तीला फिल्ड पुरस्काराने सन्मानित केले जाते.

Loading RSS Feed

Leave a Comment