धनगर समाजाला आदिवासी कोट्याशिवाय आरक्षण देणार राज्य सरकार

prithviraj-chvan
मुंबई – राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत सरकारने धनगर समाजाला आदिवासी कोट्याच्या बाहेर आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून धनगर समाजाचा केंद्र सरकारच्या तिस-या सूचीत समावेश करण्याची शिफारशीचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर मंत्री दिलीप सोपल यांच्या नेतृत्त्वाखाली एक समिती स्थापन करून लिंगायत समाजाच्या मागण्या समजून घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांनी राज्य सरकारने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नसल्याची भूमिका घेतली आहे. तसेच एसटीत समावेश होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील असेही जानकरांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment