इंटरनेट युजर संख्येत भारताची अमेरिकेवर कुरघोडी

internetindia
या वर्षअखेर इंटरनेट युजरच्या संख्येत भारत अमेरिकेला मागे टाकेल असे गुगल इंडियाचे व्यवस्थाकीय संचालक राजन आनंदन यांनी एका मेळाव्यात बोलताना सांगितले. ते म्हणाले की सध्याचा ग्रोथ रेट विचारात घेतला तर २०१८ सालापर्यंत भारतात इंटरनेट युजरची संख्या ५० कोटींवर जाईल. या वर्षअखेर भारत सर्वाधिक इंटरनेट युजर असलेला देश बनणार आहे.

राजन म्हणाले की भारतात आता नागरी आणि ग्रामीण भागातही इंटरनेटचा वापर करणार्‍यांची संख्या लक्षणीयरित्या वाढत चालली असून मोबाईलवर इंटरनेट उपलब्ध झाल्याने सर्वसामान्य नागरिकही या सेवेचा सहज लाभ घेऊ शकत आहेत. २०१८ सालापर्यंत भारतात ही संख्या ५० कोटींवर असेल म्हणजे ती अमेरिकेच्या इंटरनेट युजरच्या दुप्पट असेल. या काळापर्यंत भारताची अर्धी लोकसंख्या इंटरनेट कनेक्ट असेल. गेल्या १० वर्षात भारतातील इंटरनेट युजरची संख्या १ कोटींवरून १० कोटींवर गेली आहे. प्रत्येक महिैन्याला ५० लाख नवीन युजर इंटरनेटशी कनेक्ट होत आहेत. सध्या भारतात इंटरनेट युजरची संख्या २० कोटी आहे.

भारतीय बँक व्यवहार, खरेदीसाठी ऑनलाईनचा वापर सर्रास करू लागले आहेत. तंत्रज्ञानाची ही मोठी लाट आहे. स्मार्टफोनमध्येही भारताने गेल्या आठ वर्षात १ अब्ज कस्टमर्स मिळविले आहेत. भविष्यात माणसाच्या सर्व गरजा भागविणारी सॉफ्टवेअर उपलब्ध होतील असेही ते म्हणाले. सध्या जगात इंटरनेट युजरची संख्या २.८ अब्ज असून २०२० पर्यंत ५ अब्ज नागरिक इंटरनेटशी जोडले जातील.

Leave a Comment