लोचेटीने फेल्प्सला पछाडले

ryan-lochte
कॅलिफोर्निया – अमेरिकेच्या रेयान लोचेटीने अमेरिकन राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत पुरुषांच्या 200 मी. वैयक्तिक मिडलेत आपल्याच देशाच्या अव्वल मायकेल फेल्प्सला मागे टाकले आहे.

लोचेटी हा पुरुषांच्या 200 मी. वैयक्तिक मिडले या प्रकारात विश्व विक्रमवीर असून त्याने ही शर्यत 1 मिनिट, 56.50 सेकंदाचा अवधी घेत जिंकली. अमेरिकेच्या फेल्प्सने 1 मिनिट, 56.55 सेकंदाचा अवधी घेत दुसरे स्थान मिळविले. या शर्यतीतील शेवटच्या 50 मी. मध्ये लोचेटीने फेल्प्सला मागे टाकले.

Leave a Comment