विदेशात अपयशी कर्णधार ठरणार धोनी !

dhoni
नवी दिल्ली – भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनी विदेशी भूमीत प्रचंड अपयशी ठरत असून त्याच्या नावावर विदेशातील सर्वात अपयशी कसोटी कर्णधार असा लेबल लागण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. शनिवारी इंग्लंडविरुद्ध भारताला 1 डाव व 54 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता आणि धोनीचा हा विदेशातील 13 वा पराभव ठरला. धोनी आता विदेशी भूमीत कसोटीत सर्वाधिक पराभव स्वीकारणा-या कर्णधारांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅहम स्मिथ यांच्यासह संयुक्त तिस-या स्थानी विराजमान झाला आहे.

भारताने आजवर धोनीच्या नेतृत्वाखाली विदेशी भूमीत 27 कसोटी सामने खेळले असून त्यात केवळ 6 विजय नोंदवले तर 13 सामन्यात पराभव स्वीकारावे लागले आहेत. बाकी 8 सामने अनिर्णीत राहिले. विदेशी भूमीत सर्वाधिक पराभव स्वीकारणाऱया कर्णधारांच्या यादीत न्यूझीलंडचा स्टीफन फ्लेमिंग व वेस्ट इंडीजचा ब्रायन लारा संयुक्त अव्वलस्थानी आहेत. या उभयतांच्या खात्यावर विदेशी भूमीत प्रत्येकी 16 पराभव आहेत.

Leave a Comment