मनसेच्या ब्लू प्रिंट प्रकाशनाला टाटा, अंबानी ?

raj-thakare
मुंबई – मनसेची ब्लू प्रिंट येणार, येणार अशी मागील अनेक वर्षांपासून चर्चा होती आणि अखेर मनसेची ब्लू प्रिंट तयार झाली आहे. उद्योगपति रतन टाटा यांच्यासह मुकेश अंबानीही या ब्लू प्रिंटच्या प्रकाशनाला येणार असल्याचे सुत्रांनी म्हटले आहे.

राज यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करताना या ब्लू प्रिंटचा मुद्दा आणला आहे. त्यानंतर नाशिक महापालिकेची सत्ताही जनतेने मनसेच्या हाती दिली आहे. तर मागील विधानसभा निवडणूकीतही चांगले यश मिळाले मनसेला ब्लू प्रिंट प्रकाशनाचा मुहूर्त सापडलेला नव्हता.

मात्र मनसेच्या ब्लू प्रिंटची आता प्रतिक्षा संपलेली आहे. तसेच लवकरच या ब्लू प्रिंटचे प्रकाशन होणार असल्याचे सुत्रांनी म्हटले आहे. या सोहळ्याला रतन टाटा येणार असल्याचेही सुत्रांनी कळवले आहे. टाटांसोबतच मुकेश अंबानींनाही याचे आवताणं धाडण्याची शक्यता सुत्रांनी वर्तविली आहे.

शिवसेनेने काही दिवसांपूर्वीच व्हिजन डॉक्युमेंट सादर करुन मनसेला शह दिला आहे. त्यामुळे आता उशीरा का होईना आता राज ठाकरे ब्ल्यू प्रिंट सादर करत आहेत.

Leave a Comment