बलात्कार प्रकरणी पारसकर यांना अटकपूर्व जामीन

paraskar
मुंबई- पोलिस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांना मॉडेलवर बलात्कार प्रकरणी सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्यामुळे पारसकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पारसकर यांनी गोरेगाव येथे राहणा-या एका मॉडेलने मढ येथील एका थ्री-स्टार हॉटेलमध्ये आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार २५ जुलै रोजी मारिया यांच्याकडे केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत पारसकर यांना निलंबित करण्याची मागणी राज्य महिला आयोगाने केली होती.

याप्रकरणी झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने पारसकर यांची ताब्यात घेऊन चौकशी करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, पारसकर यांच्या विरोधात आरोप करणा-या मॉडेलने वकिलासोबत केलेल्या संभाषणाची ध्वनिफितीत केलेल्या काही विधानांचा फायदा पारसकर यांना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या ध्वनिफितीमुळेच पारसकर यांनी स्वतः निर्दोष असल्याचा दावा केला आहे.

Leave a Comment