जेट एअरवेज बंद करणार स्वस्त विमानसेवा

jet
मुंबई: आपली स्वस्त विमानसेवा बंद करण्याचा जेट एअरवेजने निर्णय घेतल्यामुळे सामान्य दर्जाचा विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला आता आणखी चाप बसणार आहे.

याबाबतची माहिती जेट एअरवेज समूहाचे अध्यक्ष नरेश गोयल यांनी माध्यमांना दिली असून या वर्षाअखेरीस जेटलाईट आणि जेट कनेक्ट ब्रँड या दोन कमी दराच्या सेवा जेट एअरवेज बंद करणार असल्याचंही गोयल यांनी सांगितले.

गोयल यांनी विमानामध्ये केवळ बिझनेस क्लास आणि इकॉनॉमी क्लासची सेवाच देणार असून या सेवांचे दर स्थिर ठेवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

यासोबतच या वर्षाच्या अखेरपर्यंत जेट एअरवेज देशांतर्गत विमानसेवा देणारी सर्वात उत्तम संस्था बनविण्याचा विश्वास गोयल यांनी यावेळी व्यक्त केला. मात्र माध्यमातील बातम्यांनुसार जेट एअरवेजला जूनच्या क्वॉर्टरमध्ये 217 कोटींचे नुकसान झाल्याच्या बातम्या आहेत. या बातम्यांचे गोयल यांनी खंडन केले आहे.

Leave a Comment