जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेसाठी सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री

cm
मुंबई : पुणे येथे होणाऱ्या जागतिक ज्युनियर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेसाठी शासनातर्फे सर्व ती मदत केली जाईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे सांगितले.

जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेच्या आयोजनाबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित केलेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी विक्रीकर आयुक्त नितीन करीर, क्रीडा विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जागतिक दर्जाचे बुद्धिबळपटू ग्रॅण्डमास्टर विश्वनाथन आनंद, अरुणा आनंद, प्रविण ठिपसे, स्वामीनाथन, स्वाती घाटे, अभय ठिपसे तसेच बुद्धिबळ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

युवाखेळाडूंची विश्व बुद्धिबळस्पर्धा आयोजित करण्याची संधी राज्याला मिळाली आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, बुद्धिबळाच्या प्रसारासाठी व राज्यातील बुद्धिबळाचा दर्जा उंचावण्यासाठी यास्पर्धेचा मोठ्या प्रमाणात उपयोग होईल. राज्यात विशेषत: ग्रामीण भागात बुद्धिबळाचा मोठ्याप्रमाणात प्रसार होण्यासाठी जागतिकदर्जाचे प्रशिक्षक नेमण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. पुणे येथे होणाऱ्या या स्पर्धेदरम्यान विश्व विजेते बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांनीही प्रदर्शनीय सामने खेळण्यास संमती दर्शविली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विश्वनाथन आनंदला जागतिक बुद्धिबळ स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment