गणेशोत्सवापूर्वीच जाहीर होणार मनसेची पहिली यादी

raj
मुंबई – राज्यात २९ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. आगामी विधानसभांसाठी मनसेनेही जोरदार तयारी केली असून पहिली १०० उमेदवार यादी गणेशोत्सवापूर्वी सादर करण्यात येणार असल्याचे एका वरीष्ठ नेत्याने सांगितले. यादी जाहीर केल्यानंतर गणेशोत्सवानंतर लगोलग मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यव्यापी प्रचार दौरा सुरू करणार असल्याचेही समजते.

मनसेची बहुचर्चित महाराष्ट्र विकास ब्ल्यू प्रिंट या महिनाअखेरी प्रकाशित केली जाणार असून रतन टाटा, मुकेश अंबानी आणि कुमारमंगलम या बड्या उद्योजकांच्या हस्ते तिचे प्रकाशन केले जाणार आहे. या तिघांच्याही तारखा मिळविण्यासाठी बोलणी सुरू आहेत असे सांगितले जात आहे. मनसेचे १०० उमेदवार निश्चित झाले आहेत. नक्की किती जागा लढवायच्या हे मात्र ठरविले गेलेले नाही. लोकसभेतील पराभव मनावर न घेता विधानसभेसाठीची तयारी सुरू आहे असेही नेते सांगत आहेत. मुबंईतील जागांवर उमेदवार निश्चित झाले आहेत. मात्र प्रथमच निवडणूक रिंगणात उतरणारे राज कोणता मतदारसंघ निवडणार याविषयी गुप्तता पाळली जात आहे.

शिवसेनेने त्यांचे व्हीजन डॉक्युमेंट यापूर्वीत प्रकाशित केले आहे त्याविषयी बोलताना हे नेते म्हणाले की आम्ही कुणावरही कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणार नाही. गेली चार वर्षे आमच्या ब्ल्यू प्रिंटवर काम सुरू आहे आणि राज ठाकरे यांच्या मनातील राज्य विकास संकल्पना या प्रिंटमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल.

Loading RSS Feed

Leave a Comment