गडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान

naxal
गडचिरोली- जंगलात पोलिस आणि नक्षलवादी यांच्यात कुरखेडा तालुक्यातील खोबरामेंडा गावाजवळच्या देवगड येथे झालेल्या चकमकीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.

आज पहाटे नक्षलविरोधी अभियान अंतर्गत पोलिसांच्या नक्षलविरोधी पथकाने देवगड जंगल परिसरात शोध मोहिम सुरु केली होती. यात पहाटे पाचच्या सुमारास पोलिस आणि नक्षलवाद्यांच्यात चकमक झाली. दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात दोन नक्षलवादी ठार झाले. चकमकीच्या ठिकाणाहून दोन बंदूक, अन्य शस्त्रे आणि नक्षली साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Leave a Comment