कसोटी मानांकनाच्या अग्रस्थानी संगकारा विराजमान

sangakakar
दुबई – लंकेचा अव्वल फलंदाज कुमार संगकाराने पाकविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शानदार द्विशतक झळकविल्यानंतर आयसीसीच्या ताज्या कसोटी फलंदाजांच्या मानांकन यादीत पुन्हा अग्रस्थानी विराजमान झाला आहे.

लंकेने पहिल्या कसोटीत संगकाराच्या द्विशतकाच्या जोरावर पाकचा पराभव केला. द. आफ्रिकेच्या डिव्हिलियर्सने यापूर्वी आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या यादीत अग्रस्थान मिळविले होते. पण डिव्हिलियर्सला खाली खेचत पहिल्या स्थानावर संगकाराने झेप घेतली. संगकाराने आतापर्यंत 81 कसोटी सामने खेळले असून त्याने यापूर्वी कसोटी फलंदाजांच्या मानांकन यादीत 671 दिवस अग्रस्थान स्वतःकडे राखले होते.

Leave a Comment