अमेरिकेत रक्ताच्या नद्या वाहतील -आयएसआयएसची धमकी

isis
अमेरिकेने इराकमधील सुन्नी दहशतवाद्यांच्या इस्लामिक स्टेट वर विमान आणि ड्रोन हल्ले सुरू केल्यानंतर या आयएसआयएसने अमेरिकेत रक्ताच्या नद्या वाहविल्या जातील अशा धमक्या दिल्या आहेत. इंटरनेट, ट्वीटर आणि अन्य सोशल मिडीया साईटवरून या धमक्या दिल्या गेल्या आहेत.

अमेरिकी दूतावास, अमेरिकन सैनिक आणि सर्वसामान्य नागरिक यांना जेथे दिसतील तेथे ठार केले जाईल असे आयएसआय्यसने धमकावले आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटरवर २००१ साली झालेला हल्ला, ठार केलेले अमेरिकन सैनिक असे फोटो आणि व्हीडीओही इंटरनेटवरून प्रसारित करण्यात येत आहेत आणि असेच परिणाम भोगण्यास तयार रहा असा इशारा अमेरिकेला दिला जात आहे. इराकी नागरिकाच्या रक्ताचा एक थेंब सांडला तर अमेरिकेत रक्ताच्या नद्या वाहतील असेही या पोस्टवरून जाहीर केले गेले आहे.

आयएसआयएस ही सुन्नी दहशतवादी संघटना दीर्घकाळ इंटरनेटचा वापर करत आहे. फोटो आणि व्हीडीओ प्रसारित करण्यासाठी त्यांनी स्वतःचे अॅड्राईड अॅपही विकसित केले आहे. पूर्वी ते गुगल प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करता येत असे मात्र नंतर गुगलने ते आपल्या स्टोअरमधून हटविले आहे. युवक भर्ती करण्यासाठी, तसेच सोशल मिडीया जिहादमध्ये सामील होण्यासाठी, फोटो आणि व्हीडीओ प्रसारित करण्यासाठी इंटरनेटचा वापर ही संघटना करत आहे.

Leave a Comment