अपघातातून बालबाल वाचले गावस्कर

sunil-gavaskar
लंडन – लिटल मास्टर सुनील गावस्कर सध्या इंग्लंडमध्ये असून एका अपघातातून बालबाल बचावले आहेत. चौथा कसोटी सामना संपल्यानंतर मँचेस्टरहून लंडनला जात असताना गावस्कर यांच्या गाडीला अपघात झाला होता.

गावस्कर, समालोचक मार्क निकोलेस आणि चंद्रशेखर पटेल लंडनला सामना संपल्यानंतर जॅग्वार कारमधून जाण्यासाठी निघाले. पावसामुळे रस्ते निसरडे झालेले असूनही गावस्कर यांची गाडी वेगात पळत होती. त्याचवेळी समोरुन वेगात आलेल्या गाडीने गावस्कर यांच्या गाडीला बाजूने धडक दिली.

गावस्कर किंचाळल्याने डुलक्या घेणारा चालक भानावर आला आणि त्याने समोरुन होणारी गाडीची धडक टाळली. अन्यथा हा भीषण अपघात ठरला असता. गावस्कर बसलेल्या जॅग्वार कारचे या अपघातात बरेच नुकसान झाले मात्र गाडीतील सर्व प्रवाशांचे जीव वाचले.

Leave a Comment